मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP Chief Sharad Pawar यांनी भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याची असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सह्याद्री अतिथिगृहावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. मात्र, यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे राजकीय संवाद साधता आलेला नाही. त्यामुळे आज ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील पहा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा रंगली होती. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमधील innovation scientific research institute च्या उदघाटन सोहळ्याचं निमंत्रणही दिलं. या संस्थेचं उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका देण्यासाठीही शरद पवार मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते.
दोन दिवसांपूर्वीही शररद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकऱ्यांना मदत, कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा तसेच कोविडमुळे संकटात आलेल्या अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.