वृत्तसंस्था : मागील २४ तासांपासून उत्तराखंड नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नैनी तलावाच्या पाणी पातळीत इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, असे असतानाच नाशिक मधून नैनीतालला गेलेल्या पर्यटकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. नाशिकचे २७ पर्यटक नैतिताल मध्ये अडकले आहेत.
नैनीताल मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने त्याठिकाणी अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी पर्यटकांना त्याठिकाणाहून निघणे अवघड झाले आहे. नाशिकचे २७ यात्रेकरु नैनितालला गेले होते. पण मागील ३० तासांपासून नैनिताल मध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे देशभरातले पर्यटक अडकून पडले आहेत. नाशिकचे पर्यटक देखील यामध्ये आहेत. त्यांनी नैनिताल मधील भीषण परिस्थितीचा आढावा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला आहे.
पहा व्हिडिओ-
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने नैनिताल प्रशासनाशी संपर्क साधला आहे. यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याची नैनिताल प्रशासना कडून व्यवस्था करण्यात येत आहे. पर्यटकांची काळजी घेऊ, त्यांना लागेल ती मदत करु, असे नैनिताल प्रशासनाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे. आतापर्यंत नैनीताल मध्ये २४ तासांत सुमारे ५०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसामुळे, नैनी तलावाचे पाणी मंगळवारी सकाळी तल्लीतालमध्ये येथील वेस पार करून रोडवेज बसस्थानकासह डीएम कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले आहे, जिथून आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. नैनीताल मधील पर्यटकांना रस्त्याने प्रवास करता येत नाही. कारण पावसाच्या कहराने नानितालचा इतर भागाशी संपर्क तुटलेला आहे.
भूस्खलनामुळे, ढिगाऱ्यांमुळे काळढुंगी, हळदवानी, भवाळीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नैनीतालला येणारे पर्यटक देखील मुसळधार पावसामुळे त्रस्त झाले आहेत. नैनीतालला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक अचानक आलेल्या आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सर्व पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्यावाचून काही पर्याय नाही. यावेळी काही पर्यटक रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.