Pune Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime News : १० बाय १० च्या घरासाठी सख्ख्या बहिणीची हत्या; शिर, हात-पाय कापून धड नदीत फेकलं

Pune Crime : पुण्यात मुठा नदीत शिर आणि हात-पाय नसलेला मृतदेह सापडला होता. पुणे पोलिसांनी या हत्येचा गुंता सोडवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सख्खा भाऊ आणि वहिनीने १० बाय १० च्या घरासाठी बहिणीची हत्या केली आहे.

Girish Nikam

पुण्यात मुठा नदीत शिर आणि हात-पाय नसलेला मृतदेह सापडला होता. पुणे पोलिसांनी या हत्येचा गुंता सोडवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सख्खा भाऊ आणि वहिनीने १० बाय १० च्या घरासाठी बहिणीची हत्या केली आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

पुण्यात मुठा नदीच्या पात्रात आढळून आलेल्या त्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. हा मृतदेह सकिना खान नावाच्या महिलेचा होता आणि धक्कादायक बाब म्हणजे तिचा खून तिच्याच सख्ख्या भावाने केल्याचं तपासातून समोर आलंय. हा खून इतक्या निर्घृणपणे करण्यात आला की पुरावे मिळू नये म्हणून भावाने आपल्या बहिणीच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले.

४८ वर्षीय धुणीभांडी करणारी सकिना खान शिवाजीनगर भागातील झोपडपट्टीत एका १० बाय १० आकाराच्या खोलीत राहायची. मात्र हीच खोली तीच्या जीवावर उठली....कारण सख्खा भाऊ अश्फाक खानचा सकीनाच्या खोलीवर डोळा होता. याच वादातून अश्फाक ने त्याच्या बायकोच्या मदतीने सकीनाचा खून केला.

भाऊ अश्फाक आणि त्याची बायको हमीदा हिने सकीनाच्या मृतदेहाचे तुकडे करत संगमवाडीच्या पुलावरून मुठा नदीत फेकून दिले. शेजारच्यांना सकीना गावाला गेल्याचं खोटं सांगितलं.सकिनाचं शिर आणि हात-पाय नसलेलं धड नदीत सापडलं होतं. पण म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते है! तांत्रिक पुरावा जोडत स्थानिकांची मदत घेत पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. खरतर भावापेक्षा जास्त कुणीच भांडत नाही,आणि भावापेक्षा जास्त कुणी समजावून सुद्धा घेत नाही मात्र अश्फाक सारखा निर्दयी भाऊ कुठल्याच बहिणीला मिळू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT