Breaking! रामदास कदम शिवसेना सोडण्याची शक्यता; पत्रकार परिषदेत करणार अनेक गौप्यस्फोट Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking! रामदास कदम शिवसेना सोडण्याची शक्यता; पत्रकार परिषदेत करणार अनेक गौप्यस्फोट

काही दिवसांपुर्वीच रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील शिवनसेनेचे नेते रामदास कदम हे लवकरच शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. आज पत्रकार परिषद घेत ते याबाबत खुलासा करणार आहेत. सोबतच शिवसेना नेत्यांवर अनेक गंभीर आरोप आणि गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. रामदास कदमांच्या व्हायरल ऑडियो क्लिप नंतर पक्ष त्यांच्यावर नाराज होता. काही दिवसांपुर्वीच रामदास कदम (Ramdas Kadam) समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून रामदास कदम हे शिवसेना सोडणार असं बोलंल जातंय. (Breaking! Ramdas Kadam likely to leave ShivSena; There will be several secret blasts at the press conference)

ऐका रामदास कदमांची ती व्हायरल ऑडिओ क्लिप -

शिवसेनेची कदमांवर कारवाई

वादग्रस्त ऑडियो क्लिप प्रकरणी रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळाला आहे.

शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र भाजप विरोधात लढतील या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रामदास कदमही शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशी माहिती साम टिव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT