Vasai factory blast Update News Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai News : वसईतील कंपनीत मोठा स्फोट, ३-४ कामगार होरपळले

वसईतील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात तीन ते चार कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Vasai Breaking News | वसई: वसईतील वाकीपाडा परिसरातील एका कंपनीत आज, बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

वसईतील (Vasai) वाकीपाडा परिसरात ही दुर्घटना घडली. येथील जुचंद्र वाकीपाडा कॉस पॉवर कंपनीत भीषण स्फोट (Blast) झाला. दुपारी साधारण दीड वाजता ही घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समजते. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच, वसई पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

नायट्रॉजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे हा भीषण घटना घडली आहे. या घटनेत ३ जण ठार झाले आहेत. तसेच ७ जण जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोट भीषण असल्यामुळे या जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

SCROLL FOR NEXT