Sugar Prices Fall  Saam Tv
मुंबई/पुणे

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

Sugar Price Falls Update News : साखरेच्या दरात मोठी घसरण झाली असून आठवडाभरात दर तब्बल १,५०० रुपयांनी खाली आले आहेत. ६४ रुपयांवरून साखरेचा दर सुमारे ४८ रुपये किलोवर आला आहे.

Alisha Khedekar

  • साखरेच्या दरात अवघ्या एका आठवड्यात तब्बल १,५०० रुपयांची घसरण

  • ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेली साखर आता सुमारे ४८ रुपये किलोवर

  • राज्यात आणि देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे साखर संघटनांनी स्पष्ट केले

  • साखरेचे दर घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

सागर आव्हाड, पुणे

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीला आता लगाम लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली असून, ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले साखरेचे दर आता सुमारे ४८ रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे साखरेच्या बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साखरेचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साखरेच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, दरात झालेल्या घसरणीमुळे राज्यात तसेच देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघानेही साखरेची उपलब्धता पुरेशी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर साखर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील साखर कारखाने, घाऊक व्यापारी, वितरक तसेच मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर करणारे औद्योगिक ग्राहक यांच्या साठ्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेद्वारे संबंधितांकडे प्रत्यक्षात किती साखर उपलब्ध आहे, साठा नियमानुसार ठेवण्यात आला आहे का आणि बाजारातील दरवाढीमागे कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारातील हालचालींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चावर त्याचा परिणाम झाला होता. मात्र, आता घाऊक बाजारातील दर खाली आल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येण्याची शक्यता आहे. साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असताना दरात झालेली अचानक वाढ नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचीही चर्चा सुरू आहे. विशेष साठा तपासणी मोहिमेनंतर बाजारातील दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या आठ महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात ५५६ शेतकरी आत्महत्या.. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

PF च्या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची चांदी! कुटुंबाला मिळणार विम्याचे दुप्पट पैसे

Beauty Tips : अप्पर लिप्स थ्रेडिंग करताना त्रास होतो? मग 'ही' एक छोटीशी ट्रिक करून पाहा

EPF Rule Change : EPF नियमात 12 वर्षांनी मोठा बदल! ₹25,000 वेतन मर्यादा; तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT