Pune Solapur Road Bus Accident:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्याजवळ भीषण अपघात! भरधाव बस झाडावर आदळली, ३० प्रवासी जखमी; काहीजण गंभीर

Pune Solapur Road Bus Accident: महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील यवत जवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला‌.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. २३ जून २०२४

पुणे जिल्ह्यातील यवतजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली बस झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये बसमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतजवळ पुणे- सोलापूर रोडवर आज दुपारी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जवळपास ३० प्रवासी जखमी झालेत.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील यवत जवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला‌. ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये जवळपास ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT