Rupali Thombre elected as NCP spokesperson Saam TV
मुंबई/पुणे

NCP Spokesperson Rupali Thombre: अजित पवारांकडून रुपाली ठोंबरे यांना मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या 'या' पदावर केली नियुक्ती

NCP Spokesperson Rupali Thombre: अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी रुपाली ठोंबरे पाटील यांची नियुक्ती केली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Rupali Thombre Elected as NCP Spokesperson: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते  अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील वरिष्ठ नेत्यांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. इतकंच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यास सुरूवात केली आहे. अशातच अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी रुपाली ठोंबरे पाटील यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) पाटील यांना प्रवक्तेपदी निवड झाल्याचं पत्र दिलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रुपाली पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला समर्थन देत मोठं विधान देखील केलं आहे.

“अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला बंड म्हणणं चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सामील झाले आहेत. गुवाहाटी किंवा कुठेही पळून न जाता अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार मित्र पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी ज्या प्रकारे तह करायचे, तसाच अजित पवारांनी हा तह केला" असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांची ओळख आहे. अन्य पक्षांकडून होणाऱ्या टीकेला रुपाली पाटील जशास तसे प्रत्युत्तर देताना दिसतात. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत रुपाली पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, त्यानंतर त्यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली होती. आता अजित पवार यांच्या गटात राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT