Eknath Shinde Operation Tiger BMC Mayor  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर? ४ बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Mumbai BMC Eknath Shinde Shivsena Operation Tiger : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी महायुतीतील सत्तावाटपाची चर्चा; संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर नजर.

Alisha Khedekar

  • मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी महायुतीमध्ये सव्वा-सव्वा वर्षाच्या सत्तावाटप

  • अडीच वर्षांनंतर महापौरपद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता

  • संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’

  • आगामी काळात मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता

मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात आगामी काळात बदल होण्याची चर्चा सुरू असून, महापौरपदावरून महायुतीमध्ये सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचं महापौरपद अडीच वर्षांनंतर शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान आता या सत्ताबदलमध्ये महापौर पद मिळवण्यासाठी शिंदेसेनेला आपलं पारडं जड कराव लागणार आहे. आता यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पालिका निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत भाजपने शिंदे गटाला महापौरपदाबाबत शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार सुरुवातीची अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील सव्वा वर्ष शिंदे गटाचा महापौर करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी आता शिंदेसेनेला आपलं संख्याबळ वाढवावं लागणार आहे. यासाठी शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ नावाची रणनीती आखल्याची माहिती आहे.

या मोहिमेची जबाबदारी चार प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. निलेश राणे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. या नेत्यांना फोन करून मिशनबाबत सूचना देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

सध्या भाजपकडे ८८, ठाकरे गटाकडे ६४, तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक असल्याची माहिती आहे. त्यामुळे संख्याबळाचं गणित बदलण्यासाठी ठाकरे गटातील नगरसेवकांना गळाला लावण्यावर शिंदे गटाचा भर आहे. दरम्यान आता ऑपरेशन टायगरचा सगळ्यात मोठा धक्का उबाठा गटाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आता संख्याबळाच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

शिंदेंनी डाव टाकला; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण

Vastu Shastra: दुसऱ्यांचे कपडे आणि चप्पल घातल्याने काय होते?

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

SCROLL FOR NEXT