Chhota Rajan News Saam Tv
मुंबई/पुणे

Chhota Rajan Bail: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा दिलासा! जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर, जन्मठेपेची शिक्षाही स्थगित

Gangster Chota Rajan Bail Granted: मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई

Chhota Rajan Bail: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात हायकोर्टाने छोटा राजनला जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

छोटा राजनला मोठा दिलासा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंडरवर्ल्ड डॉनराजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजनला याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २००१ मध्ये झालेल्या हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र इतर अनेक प्रकरणामुळे छोटा राजनचा कारागृहातच मुक्काम असणार आहे.

साल 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती . छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी त्याला सुनावली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला राजनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याच प्रकरणात त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना एक लाख रुपयांच्या अटीसह जामीन मंजूर केला.

काय आहे जया शेट्टी हत्या प्रकरण?

छोटा राजन टोळीकडून खंडणीच्या धमक्यांचा आलेल्या जया शेट्टी यांना 4 मे 2001 रोजी या टोळीतील दोन कथित सदस्यांनी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गोळ्या घातल्या होत्या. छोटा राजन टोळीकडून खंडणीच्या धमक्या मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर हॉटेलचालकाला पोलिस संरक्षण देण्यात आले. पण हल्ल्याच्या दोन महिने आधी शेट्टी यांच्या विनंतीवरून त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. राजन टोळीने रवी पुजारीच्या माध्यमातून जया शेट्टी यांच्याकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

SCROLL FOR NEXT