Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नव्या पक्षाची एन्ट्री, उमेदवारही ठरले, काँग्रेसची डोकेदुखी वाढली!

Maharashtra Assembly Election: नंदुरबार जिल्हातील नवापूर विधान सभा मतदार संघासाठी आज पहिला उमेदवारांची घोषणा झाली असून भारतीय आदिवासी पार्टी कडून अरविंद वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नव्या पक्षाची एन्ट्री, उमेदवारही ठरले, काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार

Maharashtra Assembly Elction 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. एकीकडे महायुती, महाविकास आघाडीसह घटक पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत आता भारत आदिवासी पार्टीची एन्ट्री झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे भारत आदिवासी पार्टीने नवापूर विधानसभेसाठी आपला पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे..

Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नव्या पक्षाची एन्ट्री, उमेदवारही ठरले, काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
Thane Accident: ठाण्यात हिट अँड रनचा थरार, मर्सिडिजने तरुणाला चिरडलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभेची निवडणूक घोषित झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच नेते आपआपल्या परीने फिल्डिंग लावत आहे. नंदुरबार जिल्हातील नवापूर विधान सभा मतदार संघासाठी आज पहिला उमेदवारांची घोषणा झाली असून भारतीय आदिवासी पार्टी कडून अरविंद वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भारत आदिवासी पार्टी ही सर्वसामान्यासाठी लढणारी व सर्वसामान्याना न्याय देणारी पार्टी आहे. गेल्या तीन वर्षापासून भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत सामाजिक सुरक्षा जपण्याचे काम केले व हे काम पाहता मला नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नव्या पक्षाची एन्ट्री, उमेदवारही ठरले, काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
Maharashtra Politics : 45 शिलेदार झटक्यात उतरवले, पण बंडात साथ देणारे ३ आमदार गॅसवर, पहिल्या यादीत नो एन्ट्री!

आदिवासी समाज नव्हे तर इतर सर्व समाजाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहे भारत आदिवासी पार्टीचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी माझी उमेदवारी राहणार असल्याचे अरविंद वळवी यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही नव्या पक्षाची घोषणा केली आहे. बुलढाण्यामध्ये झालेल्या जाहीर मेळाव्यातून त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली. तसेच आगामी विधानसभेला ते महाविकास आघाडीला साथ देण्याचीही शक्यता आहे.

Assembly Election 2024: विधानसभेच्या मैदानात नव्या पक्षाची एन्ट्री, उमेदवारही ठरले, काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
Crime News : बायकोनं दीर्घायुष्यासाठी करवाचौथचा उपवास केला; रात्री जेवणात विष देऊन नवऱ्याला संपवलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com