Wagholi Boyfriend Killed By Girlfriend Update Saam Tv
मुंबई/पुणे

Wagholi Girlfriend Killed Boyfriend: वाघोलीत प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण आलं समोर...

Wagholi Police: यशवंतच्या सततच्या त्रासाला आणि संशयखोर वृत्तीला कंटाळून संतप्त झालेल्या अनुजाने त्याची हत्या केली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime News: पुण्यातल्या वाघोलीमध्ये (Wagholi) सोमवारी एका तरुणीने प्रियकराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला होता. या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. अशामध्ये अनुजाने यशवंतची हत्या करण्यामागचं धक्कादायक कारण समोर आली आहे. यशवंतच्या सततच्या त्रासाला आणि संशयखोर वृत्तीला कंटाळून संतप्त झालेल्या अनुजाने त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अनुजाला अटक केली आहे.

यशवंत महेश मुंडे ( वय 22) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (वय 21) असे हत्या करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. हे दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते. गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा यांची ओळख होती. यशवंत मात्र तिला अनेकवेळा त्रास देत होता. तसंच संशय घेत होता. यावरुन दोघांची सतत भांडणं होत होती.

रविवारी अनुजा यशवंत राहत असलेल्या वसतीगृहात अभ्यासासाठी गेली होती. त्याचठिकाणी सोमवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरात भांडण झाले. त्या भांडणात अनुजाने यशवंतच्या छातीवर आणि पोटावर भाजी कापण्याच्या चाकूने वार केले. या हल्ल्यात यशवंतचा जागीच मृत्यू झाला. यशवंतच्या हत्येनंतर अनुजाने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. घाबरलेल्या अवस्थेत अनुजा बाहेर येऊन वसतीगृहाच्या बाकावर येऊन बसली.

हा सगळा प्रकार वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पाहिला. अनुजाच्या हातातून मोठ्या प्रमाणात रस्तस्त्राव होत होता. तिची अवस्था पाहून वसतीगृहातील मुलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे अनुजाचा जीव वाचला. यशवंतच्या हत्येमुळे वसतीगृहात एकच खळबळ उडाली. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यशवंतचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अनुजाला अटक केली. तिची चौकशी केली असता मानसिक त्रासाला कंटाळून तिने यशवंतची हत्या केली असल्याचे कबूल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT