boyfriend kidnapped 17 year old girlfriend from mumbai local train Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: खळबळजनक! मुंबई लोकलमधून १७ वर्षीय तरुणीचं अपहरण; पोलिसांना २५० किमी दूर सापडली

Mumbai Local News: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनमधून एका १७ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं आहे.

Satish Daud

17-year-old Girl kidnapped from Mumbai local train

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनमधून एका १७ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तरुणीची सुटका केली असून आरोपीला अटक केली आहे. मिड-डे ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

किशोर (वय १९ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपहरण व्यक्ती दुसरा कुणीही नसून तरुणीचा बॉयफ्रेंड आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, १२ ऑक्टोबरला १७ वर्षीय तरुणी बदलापूर ते विक्रोळी लोकल ट्रेनने प्रवास करीत होती.

प्रवासात असताना तिने घरी फोन देखील केला. मात्र, उशीर होऊन सुद्धा ती घरी पोहचली नाही. तसेच तिचा फोन देखील लागत नव्हता. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांना चिंता लागली. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता (Crime News) झाल्याची तक्रार दिली. आपल्या मुलीचे अपहरण झाले असावे, अशी शंका देखील मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तरुणीचा शोध सुरू केला. पोलिसांनी संशयित तरुणाचं मोबाईल लोकेशन चेक केलं असता, ते २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचं कळाली. त्यानंतर पोलिसांचं एक पथक तातडीने साताऱ्याला रवाना झालं. तिथे गेल्यानंतर पोलीस तरुणाच्या गावात धडकले.

दरम्यान, पोलिसांना तिथे १७ वर्षीय तरुणी दिसून आली. किशोरने माझे लोकल ट्रेनमधून अपहरण केले आणि मला साताऱ्यात आणले, असा जबाब तरुणीने पोलिसांना दिला. तर तरुणी स्वत:हून माझ्यासोबत आली असून मी तिचे अपहरण केले नाही, असा दावा किशोर याने केला आहे. पोलिसांनी या दोघांच्या मित्रांची चौकशी केली तर मुलगा-मुलगी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कळाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT