Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांसमोर ड्रग्स तस्कराचा खळबळजनक दावा

Lalit Patil Arrest News : मुंबई पोलिसांच्या टीमने ललिल पाटीलला चेन्नई येथे बेड्या ठोकल्या.
Lalit Patil arrested by Mumbai Police
Lalit Patil arrested by Mumbai Police Saam tv
Published On

Mumbai News :

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स तस्कर ललित पाटील पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता.

मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या टीमने ललिल पाटीलला चेन्नई येथे बेड्या ठोकल्या. ललित पाटील सध्या साकीनाका पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललितने मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)

ललित पाटीलला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणलं होतं. यावेळी मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे सगळं सांगतो, असं ललित पाटीलने माध्यमांच्या कॅमेऱ्यात बघून सांगितलं. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारित केली आहे. त्यामुळे ललित पाटील नेमकी कुणाची नावं घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Lalit Patil arrested by Mumbai Police
Mumbai Air Polution : मुंबईतील हवा 'अत्यंत खराब', मान्सूनची एक्झिट होताच वायू प्रदूषणाची एन्ट्री

ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या.

Lalit Patil arrested by Mumbai Police
Lalit Patil Arrested: मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com