Mumbai Air Polution : मुंबईतील हवा 'अत्यंत खराब', मान्सूनची एक्झिट होताच वायू प्रदूषणाची एन्ट्री

Mumbai News : मान्सूनच्या एक्झिटनंतर हवेची गुणवत्ता घसरायला सुरुवात झाली आहे.
Air Pollution Mumbai
Air Pollution MumbaiSaam Tv
Published On

Mumbai News :

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सकाळी धुकं पसरत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र हे धुकं आहे की हवेतील प्रदूषण आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत आहे.

मान्सूनच्या एक्झिटनंतर हवेची गुणवत्ता घसरायला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग कमी असल्याने लहान कण जास्त वेळ हवेत राहत आहेत. त्यामुळे सकाळी धुके दिसत आहे. याआधी दिल्लीच्या हवेची नेहमी चर्चा व्हायची. मात्र आता मुंबईची हवा दिल्लीतील हवेपेक्षाही खराब झाली आहे. (Latest News Update)

आज 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) परिसरातील एअर क्वॉलिटी इंडेक्स 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचला आहे. गेल्या हिवाळ्यात मुंबई जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. (Mumbai News)

Air Pollution Mumbai
FDA action on Mumbai Hotels : मुंबईतील प्रसिद्ध १५ हॉटेल्सना टाळं, FDAची धडक कारवाई

हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच अनेक शहरांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र मुंबईतील वायू प्रदूषण चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईतील सीएसएमटी येथे आज एअर क्लालिटी इंडेक्स 301 वर होता. नवी मुंबईत क्वालिटी इंडेस 317 वर आहे.

AQI कसा मोजला जातो?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, 0-50 मधला AQI चांगला, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 दरम्यान खराब, 301 ते 400 अत्यंत खराब तर 400 पेक्षा जास्त गंभीर श्रेणीमध्ये मानला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com