''ममता दीदी थेट बोलतात, पवार 'बिट विन द लाईन;' दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायाच आहे'' SaamTV
मुंबई/पुणे

''ममता दीदी थेट बोलतात, पवार 'बिट विन द लाईन;' दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायाच आहे''

''राज्यात कॉग्रेसला घेतल्या शिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही. शिवसेनेने गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही''

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : मुंबईमध्ये वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक दृष्टया मजबूत राज्य आहे. मुख्यमंत्री येतात आणि अपील करतात. कालचा दौरा मूळ राजकीय अजेंडा होता. तसेच 2024 ला देखील लोक नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवतील; हे असले प्रयोग 2019 साली देखील झाले आहेत. अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी का ममता बॅनर्जी, शरद पवार आणि संजय राऊत (Mamata Banerjee, Sharad Pawar and Sanjay Raut) यांच्या भेटीवरुन आणि विरोधकांची एकजुट करुन मोदींच्या विरोधात मोट बांधण्याच्या वक्तव्यावरुन केली आहे. शिवाय काँग्रेसला (Congress) बाजूला ठेवून ममता दीदी मोट बांधत आहेत आणि पवारांची त्याला साथ असल्याचही फडणवीस म्हणाले.

हे देखील पहा -

दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ते रोड शो करत आहेत हे भाजपवाल्यांना (BJP) चालतं का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'ममता बॅनर्जी राज्यातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना?' असा सवाल करणाऱ्या आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरुन आज भाजपला विचारला आहे.

आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. ममता दीदी आल्या त्यांचे स्वागत पण भाजपचा मुख्यमंत्री आला की टीका केली जाते. ही दुटप्पी भूमिका असून ममता दीदी थेट बोलतात; आणि 'पवार बिट विन द लाईन' बोलतात दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे. राज्यात कॉग्रेसला घेतल्या शिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही. शिवसेनेने (Shivsena) गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवरती केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

SCROLL FOR NEXT