Borivali News Saam Tv
मुंबई/पुणे

Borivali News: बोरिवली पोलीस ठाण्यात कैद्याची आत्महत्या; नेमकं कारण काय?

बोरिवली पोलीस ठाण्यात एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Borivali Crime News: बोरिवली पोलीस ठाण्यात एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपक जाधव असे या मृत आरोपीचे नाव आहे. दिपक हा बोरिवली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी होता.

पुण्यात एका हत्येच्या गुन्ह्यात तो येरवडा जेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ जुलै रोजी त्याचा ताबा बोरिवली पोलिसांनी घेतला. न्यायालयाने दिपकला २८ जुलै पर्यंत कस्टडी सुनावली होती. (Latest Marathi News)

मात्र, आज सकाळी ८ च्या सुमारास दिपकने कस्टडीत गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी (Police) त्याला जवळच्या शासकिय रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मात्र, दिपकने नेमकी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, बोरिवली पोलीस ठाण्यात दिपक जाधवने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सकाळी ८.१० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आले. जाधवने तिसऱ्या सेलच्या दरवाज्याच्या खीळयाला कुठल्यातरी धाग्याने गळफास घेतला. ही बाब इतर लोकांच्या लक्षात येताच त्यास तात्काळ उतरवून बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जाधव हा बोरिवली पश्चिम च्या रामचंद्र भंडारी चाळीत राहत होता. त्याच्यावर बोरिवली पोलीस ठाण्यात २६ जुलै रोजी ३२६, २७९, ३२३, ५०४ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.

त्याला न्यायालयाने २८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्यामुळे त्याला बोरवली जनरल लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. पुणे पोलिसांकडून बोरिवली पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. दरम्यान, याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT