पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. पीडित तरुणीच्या मित्राचे हात-पाय बांधून त्याच्यासमोरच तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. कोयता,चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तरुणीचे दागिणे हिसकावून घेतले होते. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आज पहाटे चार वाजता या प्रकरणातील एका आरोपीला वारजे माळवाडी मधून ताब्यात घेतलं आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी २५ पथकं तयार केली आहेत. या घटनेला आठवडा झाला तरी देखील पुणे पोलिसांना आरोपींचा शोधण्यात यश आलेलं नव्हतं. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपींना लवकरात अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. मात्र अद्यापही दोन ओरोपी फरार आहेत.
कोंढवा बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अनेक ठिकाणी फिरले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेतायेत याची त्यांना माहिती होती. मेन रोड आणि सीसीटीव्ही चुकवत त्यांना २० किलोमीटर जायच होत पण ८० किलोमीटर पर्यंत ते फिरत होते. ४ ऑक्टबर तारखे पर्यंत आरोपी पुण्यातच होते,गुन्हा दाखल झाला आहे हे कळल्यावर तिघंही फरार झाले होते. यावेळी तिघांनी वेगवेगळं जायचा त्यानंतर तीन ही आरोपी वेगळे झाले. या प्रकरणाचा ९० टक्के तपास सीसीटीव्हीमुळे शक्य झाला आहे.
गुन्हे शाखा पोलिस असे 700 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या प्रकरणात गुंतले होते.सीसीटिव्ही आणि इतर टेक्निकल बाबी वरून आरोपी ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपी पण लवकरच ताब्यात येतील.मात्र अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही काम करत आहोत. तीनच आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आहे.
आरोपी चकवा देत होते,सीसीटिव्ही असेल त्या ठिकाणच्या रस्त्यावर येत नव्हते. एआय, स्केच, सीसीटीव्ही, ड्रोनचा फायदा झाला. ७०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. तर शेकडो रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात आली. काल दुपार नंतर काही चांगली सीसीटीव्ही मिळालं त्यानंतर काही व्यक्तींचा तपास झालं आणि आरोपी असण्याची शक्यता आहे अस कळल. आरोपी जागा बदलून राहत होते. त्यातून एका ला ताब्यात घेण्यात आले आहे.तीन ही आरोपी परराज्यातील आहेत की नाही याबद्दल तपास केल्यानंतर समोर येईल, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.