Mumbai High Court on Love Relationship Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai High Court : आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार, नंतर जामिनालाही संमती; हायकोर्ट संतापलं!

Mumbai High Court on Love Relationship : आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार करायची आणि नंतर जामिनालाही स्वत: संमती द्यायची, हा पोरखेळ आहे का? असं म्हणत मुंबई हायकोर्टाने चांगलाच संताप व्यक्त केला.

Satish Daud

आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार करायची आणि नंतर जामिनालाही स्वत: संमती द्यायची, हा पोरखेळ आहे का? असं म्हणत मुंबई हायकोर्टाने चांगलाच संताप व्यक्त केला. अशा प्रकरणांमुळे पोलिसांचा आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया जातो. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी कठोर दंड आकारण्याची आवश्यकता आहे, असं मत देखील हायकोर्टाने व्यक्त केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील एका तरुणीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी एका तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ओळखीचा फायदा घेऊन तरुणाने मला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले, असा आरोप तरुणीने केला होता.

इतकंच नाही, तर आरोपीने माझे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर मोबाइल नंबर शेअर केला, असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. तरुणीच्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.

प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तरुणाने जामिनासाठी अर्ज दाखल केला. प्रकरण सुनावणीला आल्यानंतर तरुणीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असून आम्ही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवले होते, असं तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं.

आम्ही दोघांमधील हा वाद परस्पर मिटवला असून आरोपीला जामीन देण्यास माझी काही हरकत नाही, असा उल्लेखही तिने प्रतिज्ञापत्रात केला. तरुणीच्या या भूमिकेवर कोर्टाने चांगलाच संताप व्यक्त केला. आरोपीविरोधात पुरेसे पुरावे असूनही तरुणीच्या संमतीमुळे त्याला जामीन द्यावा लागत आहे, असं कोर्टाने म्हटलं

आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवायची. नंतर आरोपीला जामीन देण्यास सहमती दाखवायची हे एकप्रकारे पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर दंडाचा दणका दिला पाहिजे, असा संताप हायकोर्टाने व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT