Eknath Shinde Maharashtra Politics x
मुंबई/पुणे

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

Deputy CM Eknath Shinde: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई हायकोर्टाने केला आहे. नवी मुंबईतील बेकायदेशीर इमारत प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने एकनाथ शिंदे यांना फटकारले.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईतील वाशी येथील नैवेद्य इमारत बेकायदेशीर ठरवून पालिकेने पाडण्याची नोटीस दिली होती.

  • या नोटीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिल्याने वाद निर्माण झाला.

  • एका सामाजिक संस्थेने या स्थगिती आदेशाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • मुंबई हायकोर्टाने थेट शिंदेंना "कोणत्या अधिकारात स्थगिती दिली?" असा सवाल केला आहे.

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतल्या वाशी येथील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई हायकोर्टाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावले आहे. हायकोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या अधिकारासंदर्भात विचारणा केली. बेकायदा इमारत पाडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसा कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल हायकोर्टाने एकनाथ शिंदे यांना केला आहे. नवी मुंबईतील १४ मजली नैवेद्य इमारत बेकायदा असल्याप्रकरणी पालिकेने नोटीस दिली होती. त्यानंतर या नोटीसला शिंदेंनी स्थगिती दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील २ कथित बेकायदा इमारतीला नवी मुंबई महापालिकेकडून पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली आहे. एका सामाजिक संस्थेने एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या बेकायदेशीर इमारती पाडण्याची विनंती त्यांनी या याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टाकडे केली आहे.

या याचिकेवर सुनावणी करत असताना हायकोर्टाने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. नवी मुंबई महापालिकेने बेकायदेशीर इमारतींना नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली याची विचारणा सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने केली. आता यावर एकनाथ शिंदे यांच्याकडून हायकोर्टाला नेमकं काय उत्तर देण्यात येईल हे पाहणं महत्वाचे राहिल.

जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले? यापुढची सुनावणी शनिवारी होणार आहे. अशा प्रकारचे अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का? यासंदर्भात सुद्धा उत्तर पुढील सुनावणीमध्ये दिले जाईल. या बेकायदेशीर इमारती वाशीमध्ये आहेत. वाशीच्या सेक्टर ९ मध्ये ही नैवेद्य बिल्डिंग आहे. ती बेकायदेशीररित्या बांधण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cell Broadcast Alert: घाबरू नका! तुमच्या मोबाइलवर वाजणार सायरन; वाचा काय करावे लागेल?

Maharashtra News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनी शिवरायांना अभिवादन; अमृता फडणवीसांचं 'नमन तुला' गाणं रिलीज

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूककोंडी; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, शेकडो लोकांना फायदा

Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT