
मराठा आरक्षणावरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले.
राज ठाकरेंनी मनोज जरांगेंच्याआंदोलनावरून शिंदेंना प्रश्न केला.
एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देत आरक्षण कोणामुळे गेलं ते तपासा असं म्हटलं.
शिंदेंनी तत्कालीन सरकारलाही जबाबदार ठरवलं.
ओंकार राऊत, साम प्रतिनिधी
आरक्षण कोणामुळे गेलं, याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला होती, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातील दरे गावात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तत्कालीन सरकारवरही हल्लाबोल केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते, तरी मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईत का आलेत. जरांगे यांच्या आंदोलन त्यांच्या आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना विचारा, असं म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती.
आम्ही आधी दिलेला आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेल्या आरक्षण ते विरोधक सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत, असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी विचारायला हवं होतं. मी जे काही बोलतोय ते काही लोकांना माहिती पडावे, यासाठी बोलतोय आम्ही जे १० टक्के आरक्षण दिलं. शिंदे कमिटी गठीत करून अनेक पुरावे त्यामध्ये शोधून कुणबी नोंदी यामध्ये शोधलेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत, याचा लाभ मराठा समाज घेतोय, असे एकनाथ शिंदे म्हणालेत.
यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेलाही सणसणीत उत्तर दिलंय. मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने शिंदे मदत करत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. या टीकेला उत्तर देत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी जे करतो ते खुलेआम करतो. मी लपून छपून काही करत नाही, बंद दाराच्या आड काही करत नाही.
जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी २०१९ ला केलं होतं. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबरोबर महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तर आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी युतीला लाथाडून सरकार स्थापन केलं होतं.
ते सगळं दुरुस्त करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सरकार आम्ही आणलं. त्यामुळे त्यांनाही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मजबुतीने जे काही सर्वप्रसंग, अडचणी असतील त्यांना तोंड देऊ. सरकार म्हणून योग्य ते निर्णय घेऊ, लपून छपून काम करण्याची मला सवय नाही, असे सडेतोड उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.