Alimony Law High court News 
मुंबई/पुणे

High Court : पतीपेक्षा पत्नीचं उत्पन्न जास्त असेल तर पोटगी नाही! मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court, Alimony law : मुंबई उच्च न्यायालयाने पोटगीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त असल्यास तिला पोटगीचा हक्क राहणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

Namdeo Kumbhar

Alimony Law High court News : कौटुंबिक वादातून उद्भवणाऱ्या पोटगीच्या (Alimony) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक निकाल दिला आहे. जर पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त असेल, तर ती पतीकडून पोटगी मागू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Bombay High Court alimony latest judgment,)

पत्नीचं उत्पन्न जर पतीपेक्षा जास्त असेल, तर तिला पोटगी मिळू शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केलं आहे. परदेशातील महागड्या राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी पतीकडून पोटगी मागणं कायद्यानं चुकीचं असल्याचं कोर्टानं एका सुनावणीदरम्यान नमूद केलं आहे. तसंच केवळ उदरनिर्वाहासाठीच पोटगीचा हक्क असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, जर पत्नीचे उत्पन्न हे पतीपेक्षा जास्त असेल, तर तिला पोटगी मिळण्याचा हक्क राहत नाही. पोटगीचा हक्क हा केवळ स्वतःचा मूलभूत उदरनिर्वाह (गुजराण) करण्यासाठीच असतो, अतिरिक्त खर्चासाठी नाही. कोर्टाने नमूद केले की, पोटगी ठरवताना नेहमी पती आणि पत्नी दोघांचीही आर्थिक स्थिती तपासली पाहिजे. (Bombay High Court alimony latest judgment)

परदेशातील किंवा उच्च राहणीमानाचा महागडा खर्च भागवण्यासाठी पतीकडून पोटगी मागणे हे कायद्यानुसार चुकीचे आहे. पत्नी सक्षम असल्यास सवलत नाही: जर पत्नी स्वतःचे कुटुंब चालवण्यास सक्षम असेल आणि तिचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असेल, तर तिला पोटगी दिली जाणार नाही, असे कोर्टाकडून एका निकालात सांगण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक याचिकांवर थेट परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Garba : नवरात्रीत उपाशीपोटी गरबा खेळणे पडेल महागात, वेळीच थांबा! नाहीतर होतील 'या' ५ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Health Care : जेवण करताना पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? किती पाणी प्यावे? जाणून घ्या

राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT