Mumbai Dyeing Land Deal Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dyeing Land Deal : मुबंईच्या इतिहासातील सर्वात मोठा जमीन व्यवहार, बॉम्बे डाइंग 22 एकरचा भूखंड 5200 कोटींना विकणार

Bombay Dyeing Worli Property : वरळीतील या भूखंडाच्या विक्रीतून बॉम्बे डाईंगला ५२०० कोटी रुपये मिळणार आहेत.

कोमल दामुद्रे

Mumbai Biggest Land Deal :

मुंबईत जमिनींना सोन्याचा नाहीतर, हिऱ्यांचा भाव आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ड्रीम सिटी मुंबईतील जमिनींच्या किमतीचा अंदाज नुकत्याच झालेल्या एका व्यवहारातून तुम्हाला येईल. बॉम्बे डाइंगने मुबंईच्या इतिहासातील सर्वात मोठा जमीन व्यवहार केला आहे . वरळीतील आपली जमीन बॉम्बे डाइंड जपानच्या सुमितोमो रिएल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीला विकणार आहे.

वरळीतील या भूखंडाच्या विक्रीतून बॉम्बे डाईंगला ५२०० कोटी रुपये मिळणार आहेत. वाडिया ग्रुपच्या बॉम्बे डाईंगने गुरूवारी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

करारानुसार, सुमितोमोची उपकंपनी (Company) गोइसू या डीलसाठी दोन टप्प्यांत पैसे देणार आहे.निवेदनानुसार बॉम्बे डाइंगच्या संचालक मंडळाची बुधवारी या कराराला मंजुरी देण्यासाठी बैठक झाली. हा करार आता शेअर होल्डरच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यांच्या मंजुरीनंतर हा करार पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील.

बॉम्बे डाइंग या करारातून मिळालेला पैसा (Money) कर्ज (Loan) फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वापरेल. या बातमीमुळे गुरूवारी बॉम्बे डाइंगच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT