Bolbachchan Gang Arrested जयश्री मोरे
मुंबई/पुणे

Mumbai Crime: बोलबच्चन गॅंगच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बोलण्यात अडकवून करायचे चोरी

Bolbachchan Gang Arrested: गेल्या दोन महिन्यात घाटकोपर ते मुलुंड या परिसरात बोलबच्चन गॅंगने लुटण्याचा पाच घटना घडल्या होत्या.

जयश्री मोरे

मुंबई: बोल बच्चन करुन नागरिकांना लुटणाऱ्या त्रिकुटाला मुलुंड पोलिसांनी बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी मुलुंडच्या एस. एल. रोडवर एका वरिष्ठ नागरिकाला बोलण्यात अडकवून काही मिनिटांत त्याच्याकडील दागिने आणि रोख रक्कम मिळून १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. (Mumbai Crime News)

गेल्या दोन महिन्यात घाटकोपर ते मुलुंड या परिसरात बोलबच्चन गॅंगने लुटण्याचा पाच घटना घडल्या होत्या, त्यामुळे या वाढत्या प्रकारांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथके नेमली होती. तपासाअंती सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेले हे त्रिकूट अभिलेखावरील गुन्हेगार असलेले संजय मागडे, रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल असल्याचं निष्पन्न झालं. हे तिघे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मूळ घरापासून नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) वेगवेगळ्या लॉजमध्ये राहून पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जागा बदलत असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानुसार पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मुलुंडमध्ये केलेल्या चोरीचा १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या सोबतच परिमंडळ सात परिसरात अशाच प्रकारचे पाच गुन्हे त्यांनी केले असल्याची कबुली दिली. महत्त्वाचं म्हणजे हे तिघे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अटकेची कार्यवाही झाल्यानंतर जेलमधून बाहेर पडल्यावर पुन्हा त्यांचा हा शिरस्ता सुरू होतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT