Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; वांद्रे परिसरातील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी कर्मचारी महिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

Maratha Survey assaulted by Mumbai

मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी कर्मचारी महिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण केलं जात आहे. मराठा समाजाचे समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी आयोगाकडून युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. (Latest Marathi News)

मुंबईत (Mumbai News) देखील सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. असंच सर्वेक्षण करण्यासाठी वांद्रे परिसरात गेलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये महिला कर्मचाऱ्याला दुखापत झाली आहे.

अदिती चिपकर असं महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या मुंबई महापालिकेत आरोग्य सेविका पदावर कार्यरत आहे. मुंबई महापालिकेच्या सूचनेनुसार, गुरुवारी (१ फेब्रुवारी) दुपारी वांद्रे पश्चिम येथील एका निवासी इमारतीत सर्वेक्षण करण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, तेथे आठव्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनी चिपकर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर सोसायटीतील इतर रहिवाशांना देखील सर्वेक्षणाबाबत माहिती देऊ नये, असं सांगितलं.

यानंतर चिपकर आठव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर सर्वेक्षण करण्यासाठी आल्या. फ्लॅटमालकाशी बोलत असताना आठव्या मजल्यावरील महिलांनी चिपकर यांच्या मागे येत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्यांना मारहाण देखील करण्यात आली.

या घटनेनंतर चिपकर यांनी तातडीने वांद्रे पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला असून मारहाण करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT