Eknath shinde and uddhav thackeray
Eknath shinde and uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? आज निर्णय होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

मुंबई: शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट निर्माण झाले आणि त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज मैदानात यंदा प्रथमच दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेण्याच्या तयारीत आहे. आज मुंबई महापालिका शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी आलेल्या दोन अर्जांवर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Shivsena Dasara Melava)

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने देखील अर्ज केले आहेत. तर, शिंदे गटाला BKC मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी MMRDA ने रविवारीच परवानगी दिलेली आहे. मात्र, ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी MMRDA ने नाकारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बीकेसी मैदानासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज स्विकारण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिंदे गटाने शिवसेनेवर (Shivsena) केलेला दावा आणि त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरुच आहे. अशातच शिंदे गटाने शिवसेनेच्या नावासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे.

शिवाय ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी शिंदे गट एकही संधी सोडत नसल्याचं दिसतं आहे. यासाठी शिंदे गटाने प्रतिशिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहेच. तर शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंपासून (Balasaheb Thackeray) ओळख असलेला दसरा मेळावा देखील आता आपणच घेणार असल्याचं शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?

महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात स्व बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती भाषण असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे.

त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT