Bmc School News saam tv
मुंबई/पुणे

Bmc School News: पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणित, विज्ञानाचे विशेष धडे; BMC ने केला KAI सोबत करार

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Latest News: मुंबई महानगरपालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमी इंडियासोबत (Khan Academy India) सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये खान अकादमीकडून या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात या करारावर मंगळवारी (दिनांक १३ जून २०२३) स्वाक्षरी करण्यात आली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार आणि खान अकादमी इंडियाच्या भारतातील संचालक श्रीमती स्वाती वासुदेवन यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेकडून अजित कुंभार आणि खान अकादमीकडून स्वाती वासुदेवन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमधून शिक्षण दिले जाते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या १,१४६ असून, सुमारे ३ लाख १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  (Latest Marathi News)

तसेच खासगी प्राथमिक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांची संख्या १,०९८ असून, या शाळांमध्ये ३ लाख ७४ हजार १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत.

तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

काय आहे करार?

खान अकादमी ही एक प्रसिद्ध अमेरिका स्थित शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने नुकताच महाराष्ट्र शासनासोबतही शैक्षणिक करार केला आहे. आता मुंबई महानगरपालिकेसोबत या संस्थेने करार केला आहे. त्यानुसार इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने गणित आणि विज्ञान विषय अधिक प्रभावशाली पद्धतीने शिकविण्यात येणार आहे.

या करारानुसार विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून काही ठराविक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT