BMC Khichdi Scam mumbai-police fir against sujit patkar Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

BMC Khichdi Scam: कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सुजित पाटकरांसह अनेकांवर गुन्हा; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

BMC Khichdi Scam Latest News: खिचडी घोटाळाप्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

BMC Khichdi Scam Latest News: मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खिचडी घोटाळाप्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकरण सुमारे ६.३७ कोटी रुपये असल्याचा तपासात समोर आले आहे. खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांचाही आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला होता. संगीत हसनाळे नियोजन विभागाच्या इन्चार्ज असल्यानं खिचडीच्या टेंडरच्या फाईल्स त्यांनी हाताळल्या होत्या. सह्याद्री रिफ्रेशमेंटला कोटींचं खिचडीचं टेंडर देण्यात आलं होत. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुजीत पाटकर यांच्यासह सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT