Mumbai Bullet Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bullet Train : ...तर मुंबईतील बुलेट ट्रेनचं काम बंद होणार?, BMC ॲक्शन मोडवर, तीन दिवसांत उत्तर मागितलं

Mumbai Bullet Train Closed BMC Notice News : बीकेसी बुलेट ट्रेन प्रकल्पात वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बीएमसीने कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • बीकेसी बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडले

  • कंत्राटदारांना तीन दिवसांची मुदत देत बीएमसीकडून नोटीस

  • उत्तर न दिल्यास काम ठप्प

  • मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर पालिकेचे लक्ष केंद्रीत

बीकेसीमधील बुलेट ट्रेन स्थानक उभारणीसाठी वायुप्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंपन्यांना मुंबई महापालिकेच्या एच ईस्ट वॉर्डने नोटीस बजावली आहे. कंपन्यांनी तीन दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेच्या वायुप्रदूषण नियंत्रण पथकाने 'जी' ब्लॉकमधील बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाच्या प्रकल्पस्थळाची २८ नोव्हेंबरला पाहणी केली. यावेळेस वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे त्यांना आढळले होते. त्यामुळे पर्यावरणाला आणि सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच, यापूर्वी तोंडी सूचना देऊनही प्रदूषण कमी करण्यात बांधकाम कंपन्या अपयशी ठरल्याचे पालिकेच्या नोटिस मध्ये म्हटले आहे.

कंपन्यांना पाठवण्यात आलेली नोटीस पालिकेच्या 'एच ईस्ट' वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी काढली आहे. तीन दिवसांत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्पाचे काम थांबविले जाईल, असा इशारा या नोटिसमध्ये देण्यात आला आहे, अशी माहिती एका पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत सध्या वायुप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने २५ हून अधिक पथके तैनात केली आहेत. आता वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने बडगा उभारला आहे. पालिकेच्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचे उल्लंघन करणारे विकासक, सरकारी आणि खासगी प्रकल्पांचे कंत्राटदार यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला जात आहे. दरम्यान प्रदूषण आटोक्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजभवनाचं नाव आता लोकभवन

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Chole Bhaji Recipe: ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी कशी बनवायची?

मतदान केंद्रावर दोन गटांत तुफान राडा! आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले|VIDEO

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

SCROLL FOR NEXT