मुंबई: मनसैनिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडव्याच्या मेळाव्याला मुंबई महापालिकेनं अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये (Shivaji Parrk) मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार असून २ एप्रिलला गुढी पाडव्याच्या (Gudhi Padva) दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाषण करणार असल्यानं मनसैनिकांना कमालीच्या उत्साह आहे. (BMC Grant Permission to MNS For Organise a Gudi Padwa Meeting In Shivaji Park on 2nd April)
हे देखील पहा -
काही दिवसापूर्वी पुण्यात राज ठाकरे यांनी एका सभेत म्हटलं होतं की, "हा तर ट्रेलर फक्त आहे, पिक्चर पाडवा मेळाव्यात दाखवणार" असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरे पाडवा मेळाव्यात काय धमाका करतात याची उत्सुकता सर्वांना लागलीय. एकीकडे मुंबई-पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर (Elections 2022) असताना मनसेची संघटनाबांधणी, प्रचार, निवडणुकांची रणनीती अशा गोष्टींवर मनसे भर देत आहे.
आगामी निवडणुकांत मनसे-भाजप युती होते का हे देखील राज ठाकरेंच्या पाडव्याच्या सभेला स्पष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे राज्यातील सध्याची राजकारणाची स्थिती, तपास यंत्रणांच्या धाडी, महाविकास आघाडीतील बिघाडी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे गुढी पाडव्याला बोलू शकतात, त्यामुळे या सभेकडे सर्वांचचं लक्ष असणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.