Manasvi Choudhary
आजकाल बाजारात मिळणाऱ्या भाज्या या केमिकलयुक्त आणि बेचव असतात. भाज्यांमध्ये केमिकलची फवारणी केल्याने आरोग्यासाठी देखील हानिकारक असतात.
अशातच तुम्हाला देखील ताज्या भाज्या खायला आवडत असतील तर तुम्ही घरच्या घरी गच्चीवर किंवा बाल्कनीत कुंडीमध्ये अगदी सहजपणे 'किचन गार्डनिंग' सुरू करू शकता.
कुंडीत किंवा ग्रो बॅगमध्ये अगदी सहजपणे आणि झटपट उगवणाऱ्या ५ भाज्या कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीमधून जाणून घ्या.
हिरव्या मिरचीचे रोप तु्म्ही कुंडीमध्ये वाढवू शकता. यासाठी मिरचीच्या रोपाला जास्त पाणी लागत नाही. कडक उन्हांमध्ये तुम्ही हे रोप ठेवा.
कुंडीत मातीमध्ये पिकलेले टोमॅटो किंवा टोमॅटोच्या बिया तुम्ही लावा. टोमॅटोच्या झाडाला वेळेवर काठीचा आधार द्यावा लागतो, जेणेकरून झाड वजनाने वाकणार नाही. ही काळजी घ्या.
कुंडीत मातीमध्ये वांग्याचे रोप लावल्यास काही दिवसांमध्ये वांगी येण्यास सुरूवात होईल. रोपावर किड पडू नये म्हणून वांग्यावर केमिकलची फवारणी करणे महत्वाचे आहे.
कोिेथिबीर तुम्ही घरच्या घरी कुंडीमध्ये लावू शकता. धने हलकेसे चुरगळून मातीत पेरल्यास काही दिवसांतच टवटवीत कोथिंबीर उगवते.
पालकमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. पालक तुम्ही कुंडीमध्ये लावल्यास लवकर उगवते. पालकाच्या बिया कुंडीत पेरल्यानंतर ३ ते ४ आठवड्यांतच भाजी काढणीस तयार होते.
येथे दिलेल माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.