BMC Notice: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची बीएमसी करणार पाहणी...

Mohit Kamboj Latest News: संताक्रूज इथे ही इमारत असून, इमारतीच्या बांधकामात काही अनियमितता आढळतीय का ? याची पालिका अधिकारी पथक आज पाहणी करणार आहे.
BMC to inspect BJP leader Mohit Kamboj house ...
BMC to inspect BJP leader Mohit Kamboj house ...Saam TV
Published On

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या जूहूमधील अधिश बंगल्यावर कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली होती. याबाबत राणे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला. आता मुंबई पालिकेच्या रडारवर भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) हे आले आहेत. अनधिकृत बांधकामाच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेने (BMC) यापुर्वी कंबोज यांना नोटीस पाठवली होती, त्यानुसार आज मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यात येणार आहे. (BMC to inspect BJP leader Mohit Kamboj house ...)

हे देखील पहा -

दोन दिवस आधी पूर्व सूचना देणारी नोटीस (Notice) पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यलयाने, कंबोज रहात असलेल्या इमारतीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवली होती. पालिकेच्या पूर्व सूचना नोटिशीत कंबोज यांचं थेट नाव घेणं पालिकेने टाळलं होतं, केवळ इमारतीच नाव टाकण्यात आल होतं. संताक्रूज इथे ही इमारत असून, इमारतीच्या बांधकामात काही अनियमितता आढळतीय का ? याची पालिका अधिकारी पथक आज पाहणी करणार आहे.

BMC to inspect BJP leader Mohit Kamboj house ...
Mumbai Tourism: राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढली, महसुलातही वाढ...

याबाबत मोहितच कंबोज यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. कंबोज म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार मी तुम्हाला घाबरणार नाही. तुम्ही कितीही खोट्या केसेस टाका किंवा नोटीसा पाठवा, महाविकास आघाडीविरोधात माझा संघर्ष सुरुच राहिल असं मोहित कंबोज म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com