bmc  Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

BMC Election update : मुंबई महापालिकेसाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित साटम यांनी मोठं भाष्य केलं.

Vishal Gangurde

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महापालिकेची निवडणूक रंगतदार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची ठाकरे गटावर जोरदार टीका

कोव्हिड काळातील निष्क्रियता यावरून साटम यांची टीका

भाजपच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार

मुंबई महापालिकेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भाष्य केलं.

अमित साटम म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत कोण एकत्र आलं, कोण एकत्र आलं नाही, याला महत्व नाही. मुंबईकरांची सेवा कोणी केली. मुंबईकरांना कोस्टल रोड आणि अटल सेतू कोणी दिला. मराठी माणसाला बीडीडी चाळीत घर कोणी दिलं. कोव्हिड काळात जमिनीवर उतरून काम केलं. ऑनलाइन कोण होतं आणि ऑफलाइन कोण होतं.

'उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी उतरावं, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांचे इतर नेते होते. युवा नेते होते. युवराज होते, ते कुठे होते. कोव्हिड सेंटर स्थापन होत होतं. रिकाम्या सेंटरचा फोटो काढला. सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत. घरात बसणाऱ्या लोकांवर आम्ही बोललो, असं म्हणत ठाकरे गटावर टीका केली.

अमित साटम यांनी कोव्हिड काळात शिवसेनेचे नेते घरात बसून होते, असं म्हणत जोरदार टीका केली. अमित साटम यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नेमकी टीका कोणावर केली?

भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांच्या कोव्हिड काळातील निष्क्रियतेवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT