Bmc election update  Saam tv
मुंबई/पुणे

भाजपची मुंबईत फक्त शिंदेसेनेशीच युती, राष्ट्रवादी नकोशी? महापालिकांसाठी महायुतीची रणनीती ठरली

Bmc election : मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेसेनेची रणनीती ठरलीय... मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साईडलाईन करून जागावाटपाच्या चर्चांना सुरुवात झालीय... मात्र मुंबई महापालिकेत भाजपला राष्ट्रवादीसोबत युती का नको? नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

हिवाळी अधिवेशनानंतरच मुंबई महापालिकेचं जागावाटप ठरणार असल्याची चर्चा सुरू झालीय. या निवडणुका एकत्र लढल्या जातील अशी ग्वाही महायुतीचे नेते वांरवार देत आहेत..प्रत्यक्षात मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेसेना आणि भाजपमध्येच जागांबाबत चर्चा होणार असून राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम आहे. मात्र मुंबईत भाजपला अजितदादांची राष्ट्रवादी का नकोशी झालीय? पाहूयात...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची जबाबदारी दिलीय. मलिकांवरील आरोपांमुळे भाजपचा राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध आहे. तसंच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसल्याने मुस्लिमबहुल लोकसंख्येचे 10- 12 प्रभाग सोडून इतर प्रभागांसाठी जागावाटपाची तयारी भाजप आणि शिंदेसेनेनं सुरु केल्याची चर्चा आहे. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदेसेना निवडणुकांना समोरे जाणार.

दरम्यान महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्रित प्रचार फेऱ्या आणि सभा ही घेणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आशिष शेलारांनीही आधीच मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असा इशारा दिला होता.

दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेच्या प्रत्येकी 2 असे एकूण 4 नेते जागावाटपाच्या वाटाघाटीत सहभागी होणार असल्याची माहितीही समोर आलीय..त्यामुळे मुंबईत महायुती एकत्रित निवडणुका लढविणार नसून भाजप-शिंदेसेनेचीच युती होण्याची शक्यता आहे. अशातच शिंदेसेनेनं अनेक माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला असून भाजप किमान 120 जागा लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे शिंदेसेना 100 जागा लढवणार असल्याची शक्यताही वर्तवली जातेय.. मुंबई महापालिकेत आपलाच महापौर असावा यासाठी भाजप अजून काय काय रणनीती आखतय हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT