Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV Nws Marathi
मुंबई/पुणे

BMC Election Result: मुंबईकरांनी शिंदेसेनेतील घराणेशाहीला नाकारलं, ठाकरेसेनेतील घराणेशाहीला पसंती

Uddhav Thackeray And Eknath Shinde: मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा भरघोस मतांनी विजय झाला. मुंबईकरांनी शिंदेसेनेतील घराणेशाहीला नाकारले तर ठाकरेसेनेतील घराणेशाहीला पसंती दिली.

Priya More

Summary -

  • मुंबई महापालिकेत शिंदेसेनेतील घराणेशाहीला मतदारांनी स्पष्ट नकार दिला

  • आमदार-खासदारांच्या मुला-मुलींचा पराभव झाला

  • ठाकरेसेनेतील घराणेशाहीला मात्र मुंबईकरांनी कौल दिला

मुंबई महापालिकेत शिंदेसेनेच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलयं. तर ठाकरेंच्या घराणेशाहीला मात्र कौल दिलाय. नेमक्या कोणत्या नेत्यांच्या मुला-मुलींना मुंबईकरांनी घरी बसवलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली असली शिंदेसेनेतल्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबईकरांनी शिंदेसेनेतील घराणेशाहीला नाकारलं. पण ठाकरेसेनेतील घराणेशारीला स्वीकारलं. शिंदेसेनेनं आमदार आणि खासदारांच्या मुला-मुलींना उमेदवारी दिली खरी. मात्र मुंबईकरांनी या सर्वांना घरी बसवलं. कोणत्या आमदार-खासदारांच्या मुला-मुलींना पराभवाचा सामना करावा लागलाय ते पाहूयात....

सदा सरवणकर, माजी आमदार

मुलगा - समाधान सरवणकर

सदा सरवणकर, माजी आमदार

मुलगी - प्रिया गुरव

रवींद्र वायकर, खासदार

मुलगी - दीप्ती वायकर

राहुल शेवाळे, माजी खासदार

वहिनी - वैशाली शेवाळे

तुकाराम काते, आमदार

सून - तन्वी काते

मंगेश कुडाळकर, आमदार

मुलगा - जय कुडाळकर

तर दुसरीकडे ठाकरेसेनेच्या हातातून मुंबईची सत्ता निसटली असली तरी मुंबईकरांनी मात्र ठाकरेसेनेतल्या घराणेशाहीला खुल्या दिलानं स्वीकारलंय. ठाकरेसेनेतल्या कोणत्या आमदार-खासदारांच्या मुलांना मुंबईकरांनी विजयी गुलाल लावलाय ते पाहूयात...

मनोज जामसूतकर, आमदार

पत्नी - सोनम जामसुतकर

सुनील प्रभू, आमदार

मुलगा - अंकित प्रभू

विनायक राऊत, माजी खासदार

मुलगा - गीतेश राऊत

सुनील शिंदे, आमदार

भाऊ - निशिकांत शिंदे

हारुन खान, आमदार

मुलगी - सबा खान

संजय पाटील, खासदार

मुलगी - राजोल पाटील

मुंबईत शिंदेसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे शिंदेसेनेची अवस्था गड आला पण सिंह गेले अशी झालीय. तर सत्ता न मिळाल्यामुळे गड गेला पण सिंह आले अशी अवस्था ठाकरेसेनेची झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long & Thick Hair Care Tips: केस लांब आणि दाट होण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

New Marathi Serial : प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येतेय नवीन मालिका; प्रोमोनं वेधलं लक्ष, मुख्य अभिनेत्री कोण? शोचे नाव आहे खूपच खास-VIDEO

Skin Care : बाहेर फंक्शनसाठी जाताय आणि इंस्टंट ग्लोइंग स्किन हवीये? मग वापरा 'हा' मिल्क पॉलिश मास्क

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

SCROLL FOR NEXT