BJP and Shinde Sena leaders after finalising seat-sharing agreement for Mumbai BMC elections. saamtv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Mumbai Civic Elections Mahayuti Resolves Seat-Sharing Deadlock : शिवसेना आणि भाजपचा मुंबई महापालिकेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या वाटाघाटीनंतर आज महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलाय.

Bharat Jadhav

  • मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप अखेर निश्चित

  • भाजप १३७ जागांवर, शिंदेसेना ९० जागांवर लढणार

  • अनेक दिवस सुरू असलेली राजकीय रस्सीखेच संपली

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित झालंय. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या वाटाघाटीनंतर भाजप आणि शिवसेनेचं जागावापट झालंय. भाजप १३७ जागांवर उमेदवार देणार आहे तर शिंदे सेना ९० जागांवर लढणार आहे. जागावाटपा संदर्भात दोन्ही पक्षांकडून मोठी रस्सीखेच सुरू होती. आज अखेर तिढा सुटला असून दोन्ही पक्षांकडून जागावाटपावर सहमती दर्शवलीय.

२३ डिसेंबरपासून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज भरण्याच्या काही तासांआधीच भाजप आणि शिंदे गट शिवसेनेचं जागावाटप निश्चित झालंय. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात २०७ जागांवर आधीच एकमत झालं होतं. आज अखेरच्या २० जागांवर अंतिम निर्णय घेण्यात आला. २० जागांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. आधीच्या २०७ जागांवर झालेल्या एकमतानुसार भाजप १२८ जागा, तर शिवसेने ७९ जागा घेतल्या होत्या.

अमित साटम काय म्हणाले?

भाजप, शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा पूर्ण झालीय. याआधी आमची २०७ जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. आता आमची संपूर्ण २२७ जागांवर चर्चा झालीय. या जागावाटपानुसार भाजप १३७ जागा लढवणार आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागा लढवणार आहेत. महायुतीतील इतर मित्र पक्षांचाही यात समावेश आहे. १३७ जागा भाजपच्या कोट्यात आहेत.

तर शिवसेनेकडे ९० जागां आहेत. यात इतर मित्र पक्षांना सामावून घेतले जाईल, असं अमित साटम म्हणालेत. भाजप आणि शिवसेनेत कोणतीही नाराजी नाहीये, सर्वांना सामावून घेतल्यानं वेळ लागला. तर सकारात्मक चर्चा होऊन चांगला फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. २२७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवून १५० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आहोत, असं माजी खासदार राहुल शेवाळे या जागावाटपाच्या चर्चेवर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT