BMC Election Saam Tv
मुंबई/पुणे

Election: मोठी बातमी! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता

BMC Election: मुंबई महानगर पालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने नुकताच सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

Priya More

Summary -

  • मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट

  • बीएमसी निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता

  • डुप्लिकेट मतदार शोधणे आणि पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या सोमवारी दुसरी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी अनेक महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण करत आहेत. मतदार यादीतील दुहेरी नोंदींची यादी तयार करण्यासोबतच इतर कामं देखील वेगाने सुरू आहेत. अनेक महानगरपालिकांचे असे म्हटले आहे की, ते अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या १० डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी डुप्लिकेट मतदारांची ओळख पटवून देण्याचे आणि त्यांना चिन्हांकित करण्याचे काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक पूर्ण करत आहेत.

तर, मुंबई महानगरपालिकेने आणखी काही दिवस मागितले आहेत. कारण मतदार यादीत मतदारांची नावं दुबार आहेत की नाही हे पडताळण्यासाठी बीएमसीला आणखी वेळ पाहिजे आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना प्रदान केलेल्या मतदार यादीत फोटो नाहीत. त्यामुळे नावं दुबार आहेत की नाही याची पडताळणी करणे अवघड जात होते. अशी काही प्रकरणे आहेत जिथे एकसारखी नावे असलेल्या मतदारांना डुप्लिकेट नोंदी म्हणून चिन्हांकित केले गेले होते, असे देखील अधिकाऱ्याने सांगितले.

जानेवारीच्या मध्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसंच, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना अजूनही महापालिका निवडणुका जानेवारीच्या मध्यात होण्याची अपेक्षा आहे. निवडणुका १५ डिसेंबरनंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि त्या १५ ते १८ जानेवारी दरम्यान होऊ शकतात. 'मतदारांमध्ये कोणताही गोंधळ आणि विरोधकांकडून आरोप होऊ नयेत म्हणून आम्ही महानगरपालिकांना मतदार यादीतील विसंगती कमीत कमी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.', असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

Good News: मोठी बातमी! यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही, २५ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

विद्यार्थ्यांना गॅलरीत बसून शिक्षण घेण्याची वेळ, मुंबईतील हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार; कारण काय?

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची संधी; ७६४ पदांसाठी भरती; पगार १,१२,४०० रुपये; अर्ज कसा करावा?

EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

SCROLL FOR NEXT