Bmc Election Dispute in Maha Vikas Aghadi
Bmc Election Dispute in Maha Vikas Aghadi  Saam Tv
मुंबई/पुणे

'BMC' निवडणुकीवरून मविआत फूट? ठाकरे गट स्वतंत्र निवडणूक लढणार?

Satish Kengar

>> निवृत्ती बाबर

Bmc Election Dispute in Maha Vikas Aghadi: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. तरी देखील काँग्रेसकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याची वक्तव्य केली जात आहेत.

अशातच आता ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) नेत्यांनी देखील बीएमसी निवडणूक (Bmc Election) स्वतंत्र लढवावी, असं मत व्यक्त केलं आहे. ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांची ही वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढली तर शिवसेना ठाकरे गटाला फटका बसू शकतो, अशी शक्यता नेत्यांनी वर्तवली आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडत आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. सध्या फक्त त्याची चर्चा सुरु आहे. यातच महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही निवडणूक एकत्र लढणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही बैठक पार पडली नाही.  (Latest Marathi News)

यातच ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गटाने स्वतंत्र लढवावी, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना एकत्रित घेऊन आपण ही निवडणूक लढलो, तर मुंबई ठाकरे गटाला फटका बसू शकतो, असं देखील या नेत्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, यातच २०१७ चे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तुल्यबळ पाहिलं तर, शिवसेनेने या निवडणुकीत ८४ जागा जिंकल्या (Which party has majority in BMC?) होत्या. काँग्रेसने (Congress) २९ जागा जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादीच्या (NCP) जवळपास १३ ते १४ जागा होत्या. यामुळेच ठाकरे गटातील (Shiv Sena Thackeray Group) काही नेत्यांचं म्हणणं आहे की, आपण ही निवडणूक एकत्र न लढत स्वतंत्र लढावी. यातच महाविकास आघाडी आगामी पालिका निवडणूक एकत्र लढवणार की तिन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढतील हे पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT