Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला

Mumbai Crime : निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील विलेपार्लेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

Vishal Gangurde

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग

निवडणूक आयोगाचे कर्मचारी सर्वत्र लक्ष ठेवून

विलेपार्लेमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नेते मंडळीच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाचे कर्मचारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीदरम्यान आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पथकावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील विलेपार्लेच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी या पथकावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणुका आयोगाच्या स्थिर पथकाकडून विलेपार्लेच्या मिलन सबवेजवळ शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नाकाबंदी लावून गाड्यांचे तपासणी सुरू होती.

एका कारमध्ये मध्यरात्री चार जण बसून आले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील व्हिडिओग्राफरवर हल्ला केला. या हल्ल्यात व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाला. त्यानंतर मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर विलेपार्ले पोलीस हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे.

 निवडणूक आयोगाच्या पथकावर नेमका कुठे हल्ला झाला?

मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली.

पथकावर हल्ला कधी झाला?

विलेपार्लेमध्ये शनिवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास हा हल्ला झाला.

मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात कोण जखमी झाले?

निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकावर झालेल्या हल्ल्यात व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाला.

पोलीस काय कारवाई करत आहेत?

विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT