BMC Covid Scam Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Covid Scam: 'महापालिकेतील कोविड घोटाळ्याचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत पोचणार'

'महापालिकेतील कोविड घोटाळ्याचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत पोचणार'

साम टिव्ही ब्युरो

BMC Covid Scam: ''कोविड घोटाळ्यातील सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचणार आहेत. चव्हाण हा आदित्यची सावली बनून होता. त्यामुळे ईडीने अधिक जलद कारवाई करावी, अन्यथा माल कुठे तरी नेऊन ठेवतील'', असं शिवसेना पक्षाचे प्रवक्ते माजी किरण पावसकर म्हणाले आहेत. आज एका पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

ते असं म्हणाले, ''महापालिका कोविड घोटाळ्याच्या चौकशीला खरे पाहता विलंब झाला आहे. पहिल्या तीन महिन्यात कारवाई व्हायला हवी होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत संयम बाळगला आहे. सध्या जी कारवाई होत आहे ती गेल्यावर्षी दाखल झालेल्या तक्रारीवर होत आहे. त्यामुळे १ जुलैचा मोर्चा व या कारवाईचा काही संबंध नाही.''

आजच्या ईडीच्या धाडीत आदित्यचे निकटवर्तीय सुरज चव्हाणकडे ४ कोटीची रोकड मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ही रक्कम व मालमत्ता केवळ शोरुममधील आहे, गोडाऊन मध्ये किती मिळेल याचा अंदाज लावा, सुरजचा सुत्रधार आदित्य ठाकरेंपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  (Latest Marathi News)

ठाकरे गटाने पक्षाच्या नावावर टोळी चालवली. २४ वर्षे महापालिका ताब्यात असताना कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळाल्याने दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची वेळ आली ही परिस्थिती का निर्माण झाली? याचा विचार कधी करणार, असा प्रश्न किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

पावसकर म्हणाले, ''पीपीई कीट दररोज पाच हजार कीट घेतले गेले. मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या नाही. रेमडेसीवीर एक इंजेक्शन हाफकिन मधून ६६५ रुपयांत मिळत असताना १५६८ रुपये देऊन त्याची खरेदी केली गेली. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात केला गेला, आणि असे असूनही अन्याय झाल्याची बोंब करायची.''

ते पुढे म्हणाले, कोविड काळाचा गैरवापर करुन आदित्य व उद्धव ठाकरे यांनी पैसे काढले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पावसकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT