BMC Covid Scam: बीएमसीचा मृतदेहांच्या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा? धक्कादायक माहिती आली समोर

बीएमसीचा मृतदेहांच्या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा? धक्कादायक माहिती आली समोर
BMC Covid Scam
BMC Covid ScamSaam Tv
Published On

BMC Covid Scam: कोविद काळात मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीचं कालपासून छापा सत्र सुरु आहे. आजही ईडीने मुंबई महानारपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती कार्यालयात दाखल होत अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

BMC Covid Scam
Opposition Meeting: पाटण्यातील बैठकीआधीच आप-काँग्रेसमध्ये जुंपली, आम आदमी पक्षाचा बैठकीतून वॉक आऊट करण्याचा इशारा

'इंडिया टुडे'ला ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड काळात मोठा मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला आहे. सूत्रांनी सांगितलं आहे की, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला असून बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाला आहे. याकाळात ज्या बॉडी बॅग्स दोन हजारांना मिळत होत्या. त्याच बॅग चढ्या भावाने म्हणजेच ६ हजार ८०० रुपयांना विकत घेतल्या गेल्या.

घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव आलं पुढे

या कथित घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव देखील आता पुढे आलं आहे. यावर मात्र अद्याप त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

BMC Covid Scam
GE-F414 Engine: फायटर जेट इंजिनबाबात भारत होणार 'आत्मनिर्भर'; अमेरिकेसोबत मोठा करार होणार?

दरम्यान, आज ईडी पालिकेच्या खरेदी मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाली होती. ईडीसोबत एसबीआयचे (SBI) अधिकारी देखील होते. या संपूर्ण प्रकरणात ऑक्सिजनचे टेंडर देताना घोटाळा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधी बुधवारी मुंबईत म्हणजे २१ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत १५० कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांची कागदपत्रे ईडीच्याच्या हाती लागली आहेत. यासोबतच १५ कोटींची एफडी असलेले कागदपत्र ईडीच्या हाती लागेल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com