GE-F414 Engine: फायटर जेट इंजिनबाबात भारत होणार 'आत्मनिर्भर'; अमेरिकेसोबत मोठा करार होणार?

फायटर जेट इंजिनबाबात भारत होणार 'आत्मनिर्भर'; अमेरिकेसोबत मोठा करार होणार?
India's jet engine deal with the US
India's jet engine deal with the USSaam Tv
Published On

Ge F414 Engine India Deal: संपूर्ण जगात फक्त चारच देश आहेत, जिथे लढाऊ विमानांची इंजिने बनवले जातात. या देशात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सचा समावेश आहे. याच अर्थ जगभरात जे लढाऊ विमाने उड्डाण करत आहेत, त्याचे इंजिन याच चार देशांमधून आले आहेत.

यातच आता लढाऊ विमानाचे इंजिन बनवणाऱ्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकने (जीई) सोबत भारतात आपला प्लांट उभारण्यासाठी करार करू शकते.

India's jet engine deal with the US
Uddhav Thackeray on Bjp Alliance: उद्धव ठाकरे यांनाही भाजपसोबत युती करायची होती, मात्र त्यांची एकच अट होती...

जीई कंपनी त्यांचे प्लांट किंवा इंजिन बनवण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) परवान्याअंतर्गत देऊ शकते. कंपनी त्यांचे तंत्रज्ञान आणि डिझाइन भारतासोबत शेअर करू शकते. तसेच याशी संबंधित तंत्र देखील येथील अभियंतांना शिकवले जाऊ शकते. जेणेकरून भारतात सहज इंजिन तयार करता येईल.

जर ही इंजिने भारतात बनवली गेली तर ते स्वदेशी लढाऊ विमानांसाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण इंजिन खरेदी करण्यासाठी भारताला पुन्हा कोणत्याही देशासोबत करार करण्याची गरज भासणार नाही. (Latest Marathi News)

India's jet engine deal with the US
Darshana Pawar Death Case : शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर नेलं, अन्... दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

GE-F414 इंजिन काय आहे?

अमेरिकन नेव्ही ३० वर्षांपासून आपल्या लढाऊ विमानांमध्ये हे इंजिन वापरत आहे. हे जनरल इलेक्ट्रिकच्या (GE) फायटर जेट इंजिन सूटचा भाग आहे. जीई एरोस्पेसच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत १६०० पेक्षा जास्त F414 इंजिन वितरित केले गेले आहेत. ज्या विमानांमध्ये ही इंजिने बसवण्यात आली आहेत त्यांनी ५० लाख तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे.

ही टर्बोफॅन इंजिन २२००० lb किंवा ९८ किलोन्यूटन थ्रस्ट निर्माण करतात. हे अत्याधुनिक फुल ऑथॉरिटी डिजिटल इलेक्ट्रॉनिक कंट्रोलने (FADEC) बसवलेले आहे. म्हणजेच इंजिनची कार्यक्षमता डिजिटलपणे नियंत्रित करता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com