BMC
BMC Saam TV
मुंबई/पुणे

BMC budget 2023 : मुंबईकरांना दिलासा! कोणतीही करवाढ नाही; बजेट पहिल्यांदा ५० हजारांच्या पार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BMC budget 2023 News : देशातली सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला.

यंदा मुंबई (Mumbai) महापालिकेने विक्रमी 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर केलं. गेल्या वर्षीचं बजेट हे 45 हजार 949 कोटी रुपये होते. महत्त्वाचं म्हणजे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. एरवी हाच अर्थसंकल्प सादर करायला चार ते पाच तास लागत होते मात्र यंदा आयुक्तांनी १५ ते १८ मिनिटात अर्थसंकल्प (Budget) सादर केला. शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. बरोबर १० वाजून ४८ मिनिटांनी त्याची सांगता झाली.

  • कोस्टल रोडसाठी 3 हजार 545 कोटी रुपयांची तरतूद

  • बेस्ट उपक्रमास १३८२ कोटी रुपयांची रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येणार

  • मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी रुपये तरतूद

  • पार्किंग ॲप, व्यवसाय विकास विभाग याकरता 10 कोटींची तरतूद

  • गोरेगाव मुलुंड जोडरस्ता 1060 कोटींची तरतूद

  • गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार

  • गोरेगाव मुलुंड जोडरसत्ता 1060 कोटींची तरतूद

  • रस्ते सुधारणासाठी 2825.6 कोटींची तरतूद

  • सर्वजनिक आरोग्यसाठी 1680.19 कोटींची तरतूद

  • शिक्षण विभागासाठी 3347.13 कोटींची तरतूद

  • राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद

  • मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

  • पाणी पुरवठा प्रकल्प - 780 कोटी

  • मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटी

  • मनपा शिक्षण समितीचा 3347 कोटींचा अर्थसंकल्प

महिला ,दिव्यांग ,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी त्यांच्यासाठी भरीव तरतूद

महिला बचतगट - 11.65 कोटी

महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी

दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी

तृतीय पंथीयांसाठी अर्थ सहाय्य 2 कोटी

जेष्ठ नागरिक - 11 कोटी

महिलासाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT