Dipa Karmakar Suspended : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर २१ महिन्यांची बंदी; कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

दीपा कर्माकर हिला गोल्डन गर्ल म्हणूनही ओळखले जाते.
Dipa Karmakar Suspended
Dipa Karmakar Suspended Saam Tv

Dipa Karmakar Suspended News : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. ITA (इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी) दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळून आले.

चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दीपा कर्माकरला 21 महिन्यांसाठी अपात्रतेसह बंदी घालण्यात आली आहे. ITA ने दिलेल्या माहितीनुसार,दीपा कर्माकरला 21 महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

Dipa Karmakar Suspended
Sanjay Raut News : कसबा-चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढणार; संजय राऊतांच मोठं विधान

रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये चौथ्या स्थानावर राहिलेली दीपा हिगेनामाइन या औषधाचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. आंतरराष्ट्रीय डोपिंग एजन्सीने Hygemin S-3 Beta-2 ला बंदी घातलेल्या औषधांच्या श्रेणीत ठेवले आहे. 2021 नंतर या पदार्थावर बंदी घालण्यात आली.

गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी दीप कर्माकर ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये, दीपाने अमेरिकेच्या जगातील अव्वल अॅथलीट सिमोना बिल्स, मारिया पासेका आणि ज्युलिया स्टींगरुबर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा सामना केला.

Dipa Karmakar Suspended
Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीचे उमेदवार निश्चित?

कोण आहेत दीपा कर्माकर?

त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतातील टॉप जिम्नॅस्टपैकी एक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती. यानंतर, 2018 मध्ये तिने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. दीपा कर्माकर हिला गोल्डन गर्ल म्हणूनही ओळखले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com