thane water cut  Saam tv
मुंबई/पुणे

ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात; मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

thane water cut : ठाणे शहरातील काही भागात १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने पाणीकपातीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अत्यल्प

ठाण्यातील काही भागातही १० टक्के पाणी पुरवण्यात कपात होणार

मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला सूचना

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामळे १५ मे रोजीपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महापालिकेच्या हद्दीतही ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो, त्या ठिकाणी १० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसेच सर्व नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने आणि पाण्याची बचत करण्याबाबत विविध उपाययोजनासंबंधी सूचना मुंबई पालिकेने ठाणे पालिकेला दिल्या आहेत .

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती या भागात पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा कमी होणार?

नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, आनंदनगर, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी.

लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती : साईनाथ नगर, रामचंद्र नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, करवाळो नगर, इंदिरानगर.

वागळे प्रभाग समिती : किसननगर १ व २, शिवाजीनगर, पडवळनगर, भटवाडी, अंबिका नगर.

माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती : बाळकुम पाडा १ व २, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, गांधीनगर.

ठाण्यातील या परिसरात दैनंदिन 10 टक्के पाणी कपात पुढील आदेश प्राप्त होईपर्यत लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलंय. जलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो (El Niño) आणि आयओडी (IOD) परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT