BMC Saam TV
मुंबई/पुणे

१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यासाठी पालिकेचा ऍक्शन प्लॅन तयार!

कोणतीही मुले लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची पालिका घेणार काळजी

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील ९ लाख मुलांच्या लसीकणासाठी मुंबई महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केलाय. त्यानुसार लसीकरण केंद्र, कॉलेज आणि वस्तीपातळीवर लसीकरण केले जाणार आहे. ओळखपत्र नसलेल्या मुलांचेही लसीकरण केले जाणार आहे. यामुळे कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही. तसेच पुरेसा लसीचा साठा असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

हे देखील पहा :

मुंबई महापालिकेच्या, खासगी ३५० लसीकरण केंद्रावर तसेच ज्युनियर कॉलेजमध्येही लसीकरण केले जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी १५०० कर्मचाऱ्यांना ट्रेनींग देण्यात आलीय . त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनींग दिली जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान जनजागृती केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ५० हजार डोस उपलबध आहेत. ९ लाख मुलांपैकी दिवसाला ३० हजार मुले आली तरी आठवडाभर पुरेल इतका लसीचा साठा सध्या पालिकेकडे आहे. त्यादरम्यान पुन्हा लसीचा साठा येऊन एका महिन्यात लसीकरण पूर्ण होऊ शकतो असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबईत ज्या मुलांकडे आधारकार्ड नाही अशा मुलांच्या शाळेच्या, कॉलेजच्या ओळखपत्रावर लसीकरण केले जाईल. ज्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही अशा बाल सुधारगृह, अनाथ आश्रम आदी ठिकाणच्या मुलांचेही लसीकरण केले जाईल. लसीकरणापासून कोणाही मुलाला वंचित न ठेवण्याचा पालिकेचा निर्धार आहे. १५ ते १८ वयोगटातील अधिकतर मुलं हि ९ वि ते १२ वी दरम्यानची असणार आहेत.

या विद्यार्थ्यांच्या कॉलेजला एखादे लसीकरण केंद्र संलग्न करून लसीकरण केले जाईल. तसेच कॉलजेमध्येही लसीकरण केले जाईल. झोपडपट्टी विभागात असलेल्या लसीकरण केंद्रावरही लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. मुंबईत कोवीन ऍपवर नोंदणी केलेल्या आणि लसीकरण केंद्रावर थेट आलेल्या सर्व मुलांचे लसीकरण केले जाईल. तसेच महापालिकेच्या शाळेत या वयातील मुलांची संख्या १५ हजारांवर आहे. या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी डेटा गोळा करून शाळेतच वीस देण्याचा पालिकेचा मानस आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT