प्रचारासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयावर राज ठाकरे संतापले
मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याच्या नियमावर उपस्थित केला सवाल
ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या नव्या ‘पाडू’ मशीनवर आक्षेप
निवडणूक आयोग सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या नव्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नवीन मशीनवर देखील आक्षेप घेतला. यावरून त्यांनी फडणवीस सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब गेले आहे.
राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, 'काल ५ वाजता प्रचार थांबला. आजपर्यंत आम्ही ज्या काही निवडणूका आम्ही इतकी वर्ष पाहत आहोत. त्यामध्य निवडणुकीचा प्रचार ५ वाजता संपल्यावर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान. ही प्रथा आजपर्यंतची होती. या सरकारला काय हवं यासाठी निवडणूक आयोग काम करतंय. यासाठी त्यांनी काल एक नवीन नोटिफिकेशन काढलं. आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही ५ वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा आणि पद्धत कुठून आली याची कल्पना नाही. ही आजच कशी अचानक आली. विधानसभा आणि लोकसभेला का नव्हती?. आधीच्या निवडणुकांमध्ये का नव्हती? तुम्ही मतदारांना भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही. तर कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं आहे.'
प्रचारासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, 'प्राचाराची ही मूभा दिली का? कायदा बदलला का? या नव्या नव्या गोष्टी आणल्या जात आहेत आणि का आणल्या जात आहेत. आता त्यांनी एक पाडू नावाची मशीन आणली आहे. प्रिटिंग ऑक्जिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितले नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. मला असे वाटते आता उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र गेले आहे. हे तुम्ही आम्हाला कधी दाखवले नाही. हे नवीन काय युनीट आणले आहे. हे लोकांना माहिती नाही आणि जनतेला देखील माहिती नाही.'
निवडणूक आयोग सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. 'हे मशीन तुम्ही ईव्हीएमला लावणार आहेत. हे काय मशीन आहे. हे दाखवावे आणि सांगावे इथपर्यंत पण गेले नाही निवडणूक आयोग. ते वाघमारे याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. पण ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी महाराष्ट्रात चालू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हे रोजच्या रोज कायदे बदलत आहेत. जनतेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यसाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय का? हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे.' , असे ते म्हणाले.
तसंच, राज ठाकरे यांनी जनतेसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'शिवसैनिक आणि मनसेसैनिकांना आम्ही सांगतो की सतर्क राहा. आपल्या विभागात आणि बुथवर काय चालू आहे याकडे लक्ष ठेवा. यांचे उमेदवार लोकांकडे जात आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा आता पैसे वाटण्याचे अनेक रिल्स समोर आले आहेत. त्यात ते पैसे कसे वाटले जात आहेत हे दिसत आहे. भाजप आणि शिंदेंच्या पॅम्प्लेटच्या आत ५-५ हजार रुपये टाकून पैसे वाटले जात आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की काही ठिकाणी लोकं पैसे देखील नाकारत आहेत. हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे हा आमचा आरोप आहे. जनतेने आणि आमच्या सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांनी सतर्क राहावे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.