ajit pawar news  Saam tv
मुंबई/पुणे

अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

ajit Pawar accident : अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातावर केंद्रीय मंत्र्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित

अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ तारखेला येणार

रोहित पवार यांच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त

अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल येत्या २८ तारखेला येणार आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असल्याची माहिती हाती आली आहे. तर थर्मल काही प्रमाणात जळला आहे. ब्लॅकबॉक्स ज्या परदेशी कंपनीचा आहे, त्या कंपनीचा असिस्टंटला तपासासाठी बोलावल्याती माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजितदादांच्या अपघातावरून नवनवीन माहिती समोर येत आहे. अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेत विमान अपघातावरून अनेक माहिती सादर केली. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनाम्याची मागणी केली. आमदार रोहित पवारांच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांच्य विमान अपघातावर भाष्य केलं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं आहे की, 'एक महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारण २८ तारखेआधी प्राथमिक अहवाल येईल'.

तपास यंत्रणावर मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

'स्पष्ट स्वरूपात डीजीसीए (संस्था) यांनी प्रसिद्धीपत्र दिलं आहे. त्यामध्ये सविस्तर खुलासा केलेला आहे. तपास यंत्रणा काम करत आहे. डीजेसीएच्या माध्यमातून तपास कार्य चालू होतं. त्याच वेळोवेळी आमच्याकडून प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि एक महिन्याच्या प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेले आहे. त्या ठिकाणी जे दिलंय, त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ठेवलेलं आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा 'रुद्रावतार', 'इंदिरा इज बॅक', सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

राहुल गांधींचे बेधडक आंदोलने, आता पर्यंत किती अन् कोणते गुन्हे दाखल? प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल'

Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

SCROLL FOR NEXT