लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक; तर दरेकरांना टीसींकडून दंड! Saam Tv
मुंबई/पुणे

लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक; तर दरेकरांना टीसींकडून दंड!

सर्वसामान्या़साठी मुंबईची लोकल सुरू करावी या मागणीसाठी भाजपचे 'सविनय कायदेभंग आंदोलन' केलं आहे.

सूरज सावंत

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं मुंबईमधील निर्बंध शिथील करण्यात आले असताना, सर्वसामान्या़साठी मात्र मुंबईची लोकल बंद आहे परणामी सर्वसामान्य नागरिकांना कामावरती जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी सुध्दा खासगी प्रवास परवडेणा झाला आहे याच पार्श्वभूमीवरती लोकल सुरू करा या मागणीसाठी भाजपनं आज मुंबई व ठाण्यातील ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर 'सविनय कायदेभंग आंदोलन' केलं आहे.BJP's 'civil disobedience movement' to demand local


यावेळी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकार्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनासुध्दा यावेळी 260 रुपयांचा दंड करण्यात आला.

राज्यातील काही जिल्ह्यांमधील कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशातच मुंबई महापालिकेने मुंबई शहर व उपनगरातील निर्बंधही उठवले आहेत. दुकानs रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, मुंबई लोकल ट्रेन सुरू नसल्यानं नोकरदारांना ऑफिसेसच्या ठिकाणी जाणं अवगड झालं आहे. खासगी वाहनांनी प्रवास करताना लोकांचा वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. त्यामुळं आता कोरोना संसर्गाचा दर घटल्यानंतर तरी लोकल सुरू करावी, अशी मुंबईकरांची मागणी आहे. निदान कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असे मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व्यक्त केले आहे.

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी दरेकरांनी चर्चगेट ते चर्नीरोड असा लोकलने प्रवाससुध्दा केला. चर्नीरोड स्थानकावर दरेकर उतरल्यानंतर टिसींनी दरेकर यांना अडवून तिकिटाची मागणी केली. मात्र तिकिट नसल्यामुळे प्रवीण दरेकर यांना टीसींनी 260 रुपयांचा दंड ठोठावला. अशी माहिती स्वत: दरेकर यांनी दिली.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe: नवऱ्याचं तोंड करा गोड, घरीच बनवा रव्याची खीर

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

Mumbai Metro - 2B : मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT