Sanjay Raut News Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा प्रयत्न; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी किरीट सोमय्या प्रझेंटेशन घेऊन दिल्लीला जात आहेत. आजही ते दिल्लीला गेले आहेत. माझं गेल्या दोन महिन्यांपासून ते काय करत आहेत यांच्याकडे लक्ष आहे. मुंबईला महाराष्ट्रासपासून वेगळ करण्यासाठी मुंबईतील धनधांगडी लोक प्रयत्न करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मागिल काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

मी कोणतेही आरोप विना पुराव्याचे करत नाही. आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे घेऊन ते पैसे राज्यपाल भवनात भरले नसल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, असा दावा आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊत यांचे काल दिल्लीतून मुंबई येथे आगमन झाले झाले. शिवसेनेकडून (Shivsena) रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. (INS Vikrant scam News)

काल झालेलं समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही हा लोकांचा संताप आहे, काल सेनेचे राज्यात आंदोलन झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाते, त्यांच्याविरोधातील हा संताप आहे. असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Maharashtra Live News Update: धुळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

VIDEO : अशी ही पळवापळवी! सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले

आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – “हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं; काही तासांतच बेडरूममध्ये आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT